WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Thursday, May 15, 2014

बदल्यांची प्रक्रिया

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया 17 मेपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 16 ला जाहीर झाल्यानंतर लगेचच 17 मेपासून शासनाने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 17 ते 23 मेअखेर जिल्हा स्तरावर, तर 26 ते 31 मेअखेर तालुकास्तरावर बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रशासकीय, विनंती व आपसी स्वरूपाच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी यांच्या तालुकास्तरावर दहा टक्के प्रशासकीय, तर पाच टक्के विनंती बदल्या होणार आहेत. एका तालुक्‍यातून दुसऱ्या तालुक्‍यात होणाऱ्या प्रशासकीय बदल्या शासनाने गेल्या वर्षापासून रद्द केल्या आहेत. तालुकाअंतर्गत आपसी बदल्या होणार नाहीत. जिल्हास्तरावर कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के विनंती बदल्या होणार असून पाच वर्षे सेवा कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या होऊ शकतील. शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी वगळून इतर कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के प्रशासकीय व दहा टक्के विनंती बदल्या या जिल्हास्तरावर होणार आहेत. 31 मे रोजी 53 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी, अपंग कर्मचारी व मतिमंद मुलांचे पालक तसेच विधवा, परित्यक्‍त्या व घटस्फोटित महिला कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बदल्यांतून वगळण्यात आले आहे. प्रशासकीय व विनंती बदल्यांचा प्राधान्यक्रम असा
 1) पक्षघाताने आजारी कर्मचारी. 
 2) अपंग कर्मचारी व मतिमंद मुलांचे पालक (विनंती असल्यास).
 3) हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी. 
 4) मूत्रपिंड रोपण केलेले व डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी. 
 5) कॅन्सरने आजारी कर्मचारी. 
 6) सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी व विधवा. 
 7) विधवा कर्मचारी. 
 8) परित्यक्‍त्या व घटस्फोटित महिला कर्मचारी. 
 9) कुमारिका कर्मचारी. 
 10) 53 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी 
 11) इतर कर्मचारी. बदल्यांचे वेळापत्रक जिल्हास्तरीय बदल्या 
 17 ते 23 मेअखेर. तालुकास्तरीय बदल्या ः 
26 ते 31 मेअखेर. संघटनांची मागणी राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी बदल्यांच्या धोरणात बदल करण्याची शासनाकडे मागणी केली आहे. आचारसंहितेनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

 संघटनेच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागण्याः 
 1) प्रशासकीय बदलीसाठी पाच ऐवजी दहा वर्षे सेवा कालावधी करावा व पाच टक्के प्रशासकीय बदल्या कराव्यात. 
 2) विनंती बदलीसाठी पाच ऐवजी तीन वर्षे सेवा कालावधी धरण्यात यावा. 
 3) तालुकास्तरावरही आपसी बदल्या व्हाव्यात.
 4) महिला कर्मचाऱ्यांना बदल्यांच्या प्राधान्यक्रमात स्थान द्यावे. 
 5) आरटीईनुसार शिक्षक निश्‍चिती झाल्याने यावर्षी समायोजनात सुमारे 25 टक्के शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याने तालुकांतर्गत शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या या वेळी रद्द कराव्यात.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०